माझ्या बोलण्याचा लावू नकोस वेगला अर्थ,
पण कसं सांगू तुला
तुझ्या विना माझे आनंदी जीवन आहे व्यर्थ.
मैत्री की प्रेम
खरचं ठाउक नाही मला,
पण आयुष्यातला प्रत्येक क्षण
तुझ्या सोबत असावसं वाटतं मला.
पाहीले नाही तुला अद्याप
वाटते मला खंत,
पण तुला न पाहिल्याशिवाय
होणार नाही माझा अंत.
होइल तुझी सवय मला
म्हणुन वाटते तुला भीती,
बोललीस जेव्हा हे
कसं सांगू वाईट वाटले मला किती.
“ठेऊ का phone” म्हणतेस,
तेव्हा येतो तुझा राग मला,
पण हक्क नाही तुझ्यावर आज
मग रागावू तरी कसा तुला.
खुप मोठे आहे आयुष्य
ठाउक नाही मी कुठवर राहीन,
मरता मरता फ़क्त एकदाच
तुझी चारोळी ऐकून जाइन. (मी आहे इथे त्याच्यासाठी…)
कदाचीत नसेल आवडली कविता माझी
तरी पण लिह तुझ्या डायरीत
कदाचीत आयुष्यात पुढे-माघे कधी,
मी राहीन की नाही तुझ्या आठवणीत.
मनात होते शब्द काही
आले ओठांवर तुझ्यासाठी,
असतील अजुन शब्द काही
येतील पुन्हा फ़क्त तुझ्याचसाठी.
विचार करता-करता तुझा
शब्दानी पुरते छेडले मला,
कविता झाली की चारोळी
आता तूच सांग मला,
माझी ही कविता
ठाउक नाही समजली की नाही तुला,
पण केली तुझ्यावर मी कविता,
हे please सांगू नको कुणाला !
None found.

May 2, 2012 at 11:12 am
achha tar hi kavita aahe!!!!!!!!! nice.
well tuach lihiliyes ki kunachi maraliye?
1 suggestion “2ri poragi shoadh”