निराश झालेले कोळी

एकदा काही कोळी नदीत जाळे टाकून मासे धरीत होते. त्यांनी पुष्कळ वेळा प्रयत्‍न केला पण चांगलेसे मासे त्यांना मिळाले नाहीत. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा जाळे टाकले व ते वर उचलतांना इतके जड लागले की, त्यात भलामोठा मासा असावा असे त्यांना वाटले. पण जाळे वर ओढून पहातात तो त्यात एक मोठा दगड व अगदी थोडे बारीक मासे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांना फार वाईट वाटले; तेव्हा एक कोळी म्हणाला, ‘मित्रांनो, सुख आणि दूःख ही जुळी भावंड आहेत. त्यापैकी एक आलं की त्याच्यामागून दुसरं आलंच म्हणून समजावं.’

तात्पर्य – सुखदुःखं मनुष्यमात्राच्या मागं लागलीच आहेत. त्यापैकी एक आले की त्याच्यामागून दुसरे आलेच म्हणून समजावे.


This entry was posted in इसापनीती. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>