उंदीर आणि बैल


एक उंदीर एका बैलाच्या पायाला चावला आणि हळूच बिळात लपून बसला. बैल खूप चिडला आणि शिंग वर करून तो कोण चावले ते पाहू लागला. तेव्हा उंदीर हळूच बिळाच्या तोंडाशी आला व हसून म्हणाला, ‘तू एवढा शक्तिमान पण माझ्यासारख्या क्षूद्र प्राण्याचा सुद्धा तुला प्रतिकार करता येत नाही तर तुझ्या शक्तीचा काय उपयोग ?’

तात्पर्य – एखादा क्षूद्र प्राणीसुद्धा आपल्याला त्रास देऊ शकतो.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...
None found.