ज्ञानी व अज्ञानी

आगगाडीचा प्रवास करीत असताना, एका प्राध्यापकाला आपल्या शेजारी एक आडाणी शेतकरी बसला असल्याच आढळून आलं. स्वत:च्या ज्ञानाची घमेंड बाळगणारा तो प्राध्यापक थोड्याच वेळात त्या आडाणी शेतकऱ्याची थट्टा करुन आजूबाजूच्या बसलेल्या प्रवाशांची करमणूक करु लागला.
थॊडावेळ ती थट्टा निमूटपणे सहन केल्यावर तो शेतकरी त्या प्राध्यापकाला म्हणाला, ‘साहेब, काही झालं तरी तुम्ही ज्ञानी आणि मी अज्ञानी. तरीसुध्दा आपला गाडीतला वेळ चांगला जावा, म्हणून आपण एकमेकांना कोडी घालूया. मी आडाणी व गरीब असल्याने कोडं सोडवण्यात जर मी हरलो, तर मी तुम्हाला फ़क्त पाच रुपये द्यायचे आणि जर तुम्ही हरलात, तर तुम्ही मात्र मला पंचवीस रुपये द्यायचे. आहे कबूल?’
हे ऎकून तो प्राध्यापक आनंदला, आणि अवतीभवतीच्या सहप्रवांशावर छाप मारायलाही सुसंधी आपल्याकडे आपणहून चालून आली आहे असा विचार करुन त्या शेतकऱ्याला म्हणाला, ‘तुझी कल्पना मला मान्य आहे. पहिलं कोड, तू मला घालं.’
शेतकऱ्यानं विचारलं, ‘ज्याला उडताना तीन पाय, चालताना दोन पाय, आणि बसला असता फ़क्त एक पाय असतो, असा पक्षी कोणता?’
या कोड्याचं उत्तर देता न आल्यानं प्राध्यापक काहीसा ओशाळून म्हणाला, ‘ बाबा रे, मी हरलो. हे घे पंचवीस रुपये, आणि या कोड्याच उत्तर तू मला सांग.’
प्राध्यापकानं दिलेल्या पंचवीस रुपयांपैकी वीस रुपये स्वत:च्या खिशात टाकून, उरलेले पाच रुपये त्या प्राध्यापकाच्या हाती देत तो शेतकरी म्हणाला, ‘मला सुध्दा या कोड्याचं उत्तर देता येत नाही, म्हणून मी हरल्याचे पाच रुपये तुम्हाला देत आहे.’
एक आडाणी शेतकऱ्याने हातोहात चकविल्यामुळे फ़जिती पावलेला तो प्राध्यापक झटकून तिथून उठला व दुसऱ्या डब्यात गेला.


This entry was posted in चातुर्य कथा. Bookmark the permalink.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>